slide11 slide22 slide33

About virgaon

Welcome to virgaon

वीरगावच्या विकासाचे पाऊल पडते पुढे... !

राजमाता जिजाऊ साहेबांच्या वास्तव्याचा वैभवशाली इतिहास लाभलेले, शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि पराक्रमाच्या जोरावर जहागिरी मिळवलेले वीरांचे गाव म्हणजे वीरगाव. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेली देखणी बारव आजही गावाची तहान भागवत आहे. दुसऱ्या महायुद्धात पराक्रमाची शर्थ करणाऱ्या व्हिक्टोरियन क्रॉस सन्मान विजेत्या नामदेवराव जाधव यांची शौर्यगाथा गावकऱ्यांना आजही प्रेरणादायी आहे, सरदार शिवराव भवानराव थोरात हे स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते. पुढे ते तब्बल २७ वर्षे अध्यक्ष होते. अनेक वर्षांपासून वीरगावाला लाभलेला हा वैभवशाली ऐतिहासिक वारसा स्वातंत्र्योत्तर काळात गावाला लाभलेले नेतृत्व जतन करत आहे. अकोले तालुक्यातील पहिली सहकारी सेवा सोसायटी वीरगाव येथे सुरु झाली जहागीरदार आबासाहेब गोविंदराव थोरात हे पहिले चेअरमन तालुक्यात होते. त्यांच्या दुरदर्शी नेतृत्वाखाली तालुक्यात सहकाराचा श्रीगणेशा झाला.

दशावतारी खेळ म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेली आखाडी हा वीरगावचा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. गावकऱ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी जिल्हा परिषदेची शाळा ३ ऑगस्ट १८९१ रोजी सुरु झाली. नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन अशा उपक्रमांत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात शाळेने नावलौकिक प्रस्थापित केला आहे........

Read More

जिल्हा परिषद अहमदनगर. आर.आर.(आबा)पाटील.सुंदरगांव. ॥पुरस्कार जाहीर ॥ वीरगांव ग्रामपंचायत ता अकोले जि अहमदनगर

ग्रामपंचायत अंतर्गत विविध उपक्रम

वीरगाव ग्रामपंचायत अनेक प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबवीत असतात. त्यापैकी काही खाली दिलेले आहेत .उदा : प्रधानमंत्री आवास योजना घरकुल, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत शोष खड्डे

See More


आमचे विजन (Vision)

विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. गावाच्या विकासासाठी भविष्यात काही योजना आणि विशेष उपक्रम राबवणे विचाराधीन आहेत.

  • १. प्राथमिक शाळेला राज्यातील 'मॉडेल स्कूल' म्हणून विकसित करणे. आनंदगड संकुलात वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय सुरु करणे.
  • २. संरक्षित औषधी वनस्पतींची लागवड करणे, स्मशानभूमी परिसरात उद्यान उभारणे.
  • ३. बचत गटांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण करणे, महिलांना घरगुती उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे, घरोघरी लघुउद्योग सुरु करण्यास प्रशिक्षण आणि चालना देणे.
  • 4.शिवार अंतर्गत तसेच वाड्या-वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे.
  • ५. शेती आधारित उद्योग उभारून स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
  • ७. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारणे.
  • ८. गावातील शाळेतल्या मुली, सर्व युवती आणि महिलांना सॅनिटरी नॅपकीन पुरवणे. त्यासाठी गावात बचत गटाच्या मार्फत नॅपकीन तयार करणे.
  • ९. वेगवेगळ्या पिकांच्या अभ्यासकांना, शास्रज्ञाना निमंत्रित करून शेतक-यांना मोफत सल्ला/मार्गदर्शन करणे.
  • १०. माहिती तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी परिणामकारक वापर करणे.
  • ११. माहिती आणि सुविधा केंद्र सुरु करणे, नागरिकांना सर्व शासकीय योजनांची माहिती यातून मिळेल.
  • १२. युवकांसाठी व्यायाम शाळा सुरु करणे.

  • गावातल्या अनेक कुटुंबात विद्यार्थ्यां ना अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण नाही. त्यासाठी गावात अभ्यासिका सुरू करणार आहोत. तिथे पूरक वाचनासाठी पुस्तके असतील. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक आणि अधिकारी येतील. कॉन्फर्सिंगद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता येईल. विकिपीडिया, युट्यूब असे गुगल सर्च करुन माहिती घेता येईल. पुरेसा उजेड, खेळती हवा अशी सर्व भौतिक सुविधा तिकडे उपलब्ध असतील.