मोलाची राहिली आहे. सध्या शांताराम धुमाळ ग्रामविकास अधिकारी आहेत. गावातील तंटे बखेडे शक्यत्तो पोलिस स्टेशन कोर्ट रीपर्यंत जात नाहीत. गाव पातळीवर तडजोड करण्यावर भर असतो. तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब मुळे आहेत. गावात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. निवडणुकीच्या काळात आपापल्या राजकीय पक्षाचे काम नेटाने करणारे कार्यकर्ते निवडणुकीनंतर राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून गावाच्या विकासात योगदान देत आले आहेत, गावाचे हे वेगळेपण उठून दिसते. यातून गाव विकासाच्या दिशेने गतीने वाटचाल करत आहे. ग्रामपंचायत हे गावाच्या ग्रामविकासाचे मंदिर बनले आहे. ग्रामपंचायतीला राजकीय अड्डा न बनवता ग्राम विकासाच्या या मंदिराचे पावित्र्य सर्व नेते आणि कार्यकर्ते जपत आले आहेत.
ग्रामपंचायत वीरगाव
ता. अकोले जि. अहमदनगर
स्थापना – २८/०३/१९५६