ग्रामपंचायत अंतर्गत विविध उपक्रम

वीरगाव ग्रामपंचायत अनेक प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबवीत असतात. त्यापैकी काही खाली दिलेले आहेत .उदा : प्रधानमंत्री आवास योजना घरकुल, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत शोष खड्डे
See More

सुंदर गाव पुरस्कार

आर.आर. (आबा) पाटील तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेवर वीरगावने आपली मोहोर उमटवली आहे. अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन २०२१-२२ या कालावधीत सुंदर गाव स्पर्धेतील निर्धारित निकषांमध्ये तालुका स्तरावर सर्वोत्तम कामगिरी वीरगाव ग्रामपंचायतीने केली आहे.

अन्न गरजूंना दान करेन अशी शपथ

ग्रामपंचायत वीरगाव अंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा वीरगाव येथे अन्न वाया घालवणार नाही अशी जनजागृती करण्यात आली तसेच उरलेलले अन्न गरजूंना दान करेन अशी शपथ घेण्यातआली.

गणेश मूर्ति

‘माझी वसुंधरा अभियान 4.0' अंतर्गत वीरगाव ग्रामपंचायतच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ति तयार करण्याची कार्यशाळा पार पडली.

अमृत वाटिका

माझी वसुंधरा अंतर्गत अमृत वाटिका निर्मिती वृक्ष लागवड

इतर उपक्रम

"स्वच्छता संदेश ”

वीरगाव ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधकाम अरण्यात आलेल्या नॅडेफमध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा केला जातो व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार केले जाते ,कंपोस्ट खत हे ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांना घातले जाते

आपण हे समजून घेतले पाहिजे की हे केवळ आपल्या पंतप्रधानांचे कार्य नाही तर समाजातील प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे

स्वच्छ भारत मिशन

वीरगाव ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधकाम अरण्यात आलेल्या नॅडेफमध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा केला जातो व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार केले जाते ,कंपोस्ट खत हे ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांना घातले जाते

सिंगल युज प्लास्टिकवर बंदी

ग्रामपंचायत वीरगाव मध्ये प्लास्टिक कचरा (सिंगल युज प्लास्टिकवर बंदी )बाबत जनजागृती करण्यात आली

हरित भेट वस्तू

ग्रामपंचायत वीरगाव कडून स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ झाडांचे (हरित भेट वस्तू ) वाटप करण्यात आले.

ई-कचरा जनजागृती

ग्रामपंचायत वीरगाव अंतर्गत ई-कचरा जनजागृती व संकलन केलेता ई-कचरा अधिकृत विघटन करणऱ्याना आणि पुनर्वापरकर्त्यांना पाठवले जाते